CM Thackeray Sakal
पुणे

पुण्यात चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

दत्ता लवांडे

पुणे : पुण्यात चांदणी चौकातील वाहतुककोंडीमुळे तेथील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणचा दौरा केला असून तेथील पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

(Pune Chandani Chauk Traffic Issue Updates)

पुण्यातील वाहतूककोंडी हा पुणेकरांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात अनेकदा लोकांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच आज या चौकाची पाहणी केली आहे. तर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम केले जाणार असून १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान या पुलाचे पाडकाम करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

चांदणी चौकातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागाकडून एकत्र येत काम केले जाणार आहे. ही जबाबदारी राज्य सरकारची असून यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे असं मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.

तर उद्यापासूनच चांदणी चौकातील वाहतूक कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीचा वाद नंतर सोडवा, आधी वाहतूकीचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना आम्ही पोलिसांना आणि संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर लवकरच जिल्ह्याला पालकमंत्री देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT