Pune Chandni Chowk traffic jam
Pune Chandni Chowk traffic jam 
पुणे

Pune : पुलाचे काम, पावसामुळे चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चांदणी चौक येथील पुल पाडण्यासाठी सुरू असलेले पूर्व तयारीचे काम आणि सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सायंकाळ नंतर चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी वाकड, औंध, बाणेर मार्गे गणेशखिंड रस्त्याने वाहने वळविल्याने रात्री दहा वाजेपर्यंत एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. 1 - 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहन चालक अक्षरशः त्रस्त झाले होते.

वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने चांदणी चौक येथील एनडीए बावधन जुना पूल रविवारी पहाटे (ता.2) पाडण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग महामंडळ यांच्याकडून पुलाच्या ठिकाणी पूर्व तयारी केली जात आहे. हे काम वेगात सुरू असल्याने चांदणी चौकातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. महामार्गावरील एका लेनवर बॅरिकेड्स टाकण्याचे काम सुरू झाल्याने वाहतूक आणखीच संथ झाली. त्यातच गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत पाणी आले. त्याचा हि परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे चांदणी चौकातून कोथरूड, वारजे या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, चांदणी चौक परिसरात वाहतूक संथ झाल्याने नागरिकांनी, पर्यायी मार्ग म्हणून वाकड, बालेवाडी येथून औंध व बाणेर मार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातून पुढे शिवाजीनगरला जाण्याचे निश्चित केले. मात्र बाणेर, औंध येथून ते विद्यापीठ मुख्य चौकापर्यंत एक - एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. विद्यापीठ ते थेट औंध येथील ब्रेमेन चौकात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये रुग्णवाहिका हि अडकली होती. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. रात्री 10.15 नंतर वाहतूक कोंडी कमी झाली.

• शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ पर्यंत वाहतूक कोंडी

शिवाजीनगर हून बाणेर, औंधला जाण्याऱ्या नागरिकांनी शिवाजीनगर ते विद्यापीठ येथ पर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी मध्ये आणखीनच भर पडत गेली.

"पुलाच्या पाडकामासाठी चांदणी चौक परिसरातील आणखी एक लेन कमी केली आहे. येथील मार्गावर सायंकाळी बॅरिकेत उभारल्याने रस्ता थोडा अरुंद झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र, कोंडी झाली नाही. आता वाहतूक सुरळीत आहे." राम राजमाने , वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन वाहतुक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT