Medha Kulkarni
Medha Kulkarni 
पुणे

Pune Chandani Chowk: "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं"; मेधा कुलकर्णींच्या भावनांचा उद्रेक

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नव्या उड्डाण पुलांसह रस्त्यांचं सुटसुटीत जाळं तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबई, सातारा आणि कोथरुडकडं जाण्याऱ्या नागरिकांची कसरत कमी होणार आहे. याचं कामाचं आता उद्या मोठ्या सोहळ्यात उद्घाटन पार पडणार आहे.

पण या उद्घाटनापूर्वीच भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे. कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून त्याला "असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं" असा मथला दिला आहे. यातूनच त्यांना काय म्हणायचंय हे देखील प्रतीत होतं. (Pune Chandni Chowk Medha Kulkarni criticism on Chandrakant Patil post viral)

मेधा कुलकर्णींनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

'असं निष्ठावंतांचं डावललेलं जिणं'

माझ्यावरील कुरघोडया, डावलणं याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही... पण आता दुःख मावत नाही मनात... वाटलं बोलावं तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रकं पहिली आणि खूप वाईट वाटलं.

चांदणी चौक या विषयाचं सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला" (Latest Marathi News)

सध्याच्या नेत्यांना सर्व श्रेय पाहिजे

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूड'चे आधुनिक कुठलेच नेते या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून मी सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचंच असल्यासारखं वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते... माझ्या सारख्यांचं अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? (Marathi Tajya Batmya)

वरिष्ठांकडं गाऱ्हाणी मांडली

मध्यंतरी आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाहजी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी'चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला पास दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीत मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत.

माझी काही किंमत नाही

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलानं कार्य करायचं सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचं, काटाकाटीचं राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

आता असह्य होऊ गेलं

माझ्याबाबत त्यांना असं करणं सोपं जातं. माझ्याकडं ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेनं काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT