Union Minister Ramdas Athawale esakal
पुणे

Pune : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु छगन भुजबळ-जरांगेंनी वाद मिटवावा, आठवलेंचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ‘ओबीसी’च्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी मांडली. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी अपापसातील वाद मिटवावा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुण्यात आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे सांगून आठवले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छगन भुजबळ देखील आग्रही आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे योग्य असे काम चालू आहे. जातीयवाद समाजातून संपला पाहिजे. जातीनिहाय जनगणना केली पाहिजे आणि त्यातून लोकसंख्येनुसार प्रत्येक जातीला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ‘ओबीसी’मधून मिळालेले आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT