पुणे

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून

CD

पुणे/आळेफाटा, ता. १९ : जुन्नर तालुक्यातील एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा केल्यानंतर स्वतः पोलिसांसमवेत मुलीचा शोध घेण्याचे सोंग करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी आज आरोपी पांग्या उर्फ साहिल संपत खैरे याला जुन्नरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संबंधित अल्पवयीन मुलगी आजारी असल्याने मंगळवारी (ता. १८) शाळेत गेली नव्हती. दुपारी पालकांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. आरोपीने मुलीला पेरू खाण्याचे आमिष दाखवून शेतात ओढ्याजवळ नेले. तेथे लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला.
मुलगी घरात न आढळल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला; मात्र ती न सापडल्याने आळेफाटा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपास सुरू असताना आरोपी स्वतः शोधकार्यात मदत करण्याचे नाटक करत पोलिसांसमवेत फिरत होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या एका ओढ्याकाठी झाडाजवळ बालिकेचा मृतदेह आढळून आला. न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.


१५ दिवसांत आरोपपत्र दाखल करणार
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी नराधमावर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी माजी आमदार अतुल बेनके आणि संतप्त ग्रामस्थांनी केली. त्यावर पोलिस अधीक्षक गिल यांनी घटनेचा तपास करून १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच, जलद गतीने तपास करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. दरम्यान, मृत पीडित मुलीचे पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT