child 
पुणे

पुणे: कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या बालकांसाठी बालगृह

सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावले आहे तसेच ज्यांचे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत आहेत, अशा बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येणार आहे.

पुणे- कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावले आहे तसेच ज्यांचे दोन्ही पालक वैद्यकीय उपचार घेत आहेत, अशा बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येणार आहे. अशा बालकांची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या चार बालकांना संगोपनासाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे. (Pune children shelter who lost their parents due to corona rajesh deshmukh)

कोरोनाच्या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी राज्यात जिल्हास्तरीय बाल संरक्षक कृती दल गठित करण्यात आले आहेत. याबाबत टास्क फोर्सच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अशा बालकांचे शोषण टाळणे आणि ती बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत. तसेच, बालकामगार तयार होणार नाहीत, याची दक्षता पोलिस विभागामार्फत घेण्यात येणार आहे.

बाल कल्याण समितीमार्फत त्यांचे पुनर्वसन करणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्यांचे आर्थिक, मालमत्ता विषयक व कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. अशा बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार दत्तक प्रक्रियेची कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

बालगृहात दाखल करण्यात आलेल्या बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांच्या मालमत्तेबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येईल. संगोपनाचा प्रश्न निर्माण झालेल्या बालकांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT