पुणे

Pune School Crime: पुण्यात तणाव! लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची व्हॅन कार्यकर्त्यांनी फोडली; वंचित आक्रमक

Vanchit Bahujan Aaghadi: मागच्या महिन्यात बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये आगडोंब उसळला होता. या प्रकरणातल्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यामध्ये अशीच घटना घडली आहे.

संतोष कानडे

Pune crime news: पुण्यात चालत्या स्कूल व्हॅनमध्ये चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शहरातील वानवडी परिसरात हा धकादायक प्रकार उघडीस आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणातल्या आरोपीची स्कूल व्हॅन फोडली आहे. आरोपी समोर आला तर असाच धडा शिकवू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

मागच्या महिन्यात बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये आगडोंब उसळला होता. या प्रकरणातल्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यामध्ये अशीच घटना घडली आहे.

पुण्याच्या घटनेतील आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना व्हॅनमधून शाळेत सोडण्याचे काम करत होता. आरोपीच्या व्हॅनमध्ये दोन्ही पीडित मुलींना तो पुढच्या सीटवर बसवत असे. दोन्ही मुलींना जवळ बसवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाच्यता कुठे केली तर धमकीसुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी प्रकरणी 45 वर्षीय स्कूल व्हॅन चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करत होता, अशी प्राथमिक माहिती आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिने तिच्या प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेलं कृत्य अल्पवयीन मुलीने आईला सांगितलं. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT