पानशेत धरणातून सर्वात जास्त विसर्ग सव्वा दहा वाजता १८ हजार ७८४ क्युसेक अंबी नदीत सोडला. ते पाणी थेट खडकवासला धरणात जमा झाले.
खडकवासला - पुणे आणि रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगर दऱ्या खोऱ्यात गुरुवारी पहाटे पासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पानशेत धरण आज गुरुवारी सकाळी सात वाजता १०० टक्के भरले. त्यानंतर, पानशेत धरणातून सर्वात जास्त विसर्ग सव्वा दहा वाजता १८ हजार ७८४ क्युसेक अंबी नदीत सोडला. ते पाणी थेट खडकवासला धरणात जमा झाले. आज सर्वाधिक २६ हजार ८०९ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले होते. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक विसर्ग आहे.
पानशेत, वरसगाव धरणाच्या शेवटच्या टोकाला रायगड जिल्ह्याची हद्द आहे. कोकण घाटमाथ्यावर दोन दिवस अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. आज गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मागील ३५ तासात पानशेत येथे १२८, वरसगावला १३७ तर टेमघर येथे २३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. या पावसामुळे याच काळात पानशेत येथे सुमारे एक टीएमसी वाढ झाली आहे. वरसगावला १.२७ टीएमसी वाढ झाली आहे. टेमघर येथे ०.३९० टीएमसीची वाढ झाली आहे. पानशेत- वरसगाव मध्ये मिळून सुमारे सव्वा दोन टीएमसीची वाढ झाली आहे.
पानशेतचा विसर्ग असा वाढला
पानशेत धरण बुधवारी सायंकाळी पाच वाजता ९६.३१ टक्के झाले. मध्यरात्री १२ वाजता ९९.१३ टक्के भरले. म्हणून पानशेत मधून ६८३ क्यूसेक विसर्ग नदीत सोडला. परंतु पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणातील विसर्ग बंद केला. दरम्यान गुरुवारी पहाटे पाच वाजता रायगड जिल्ह्यालगत पावसाची मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा परिणाम पाण्याची पातळी वाढल्याने सकाळी सहा वाजता ९८.३८ टक्के आणि सकाळी सात वाजता १००टक्के भरले. त्यामुळे सकाळी सात वाजता ९७७ क्यूसेक पाणी सोडले. आठ वाजता एक हजार ९८०, साडेआठ वाजता तीन हजार ९०८, नऊ वाजता ७ हजार ३७६ क्यूसेक, साडे नऊ वाजता १२ हजार ९३६ क्यूसेक तर सकाळी सव्वा दहा वाजता १८ हजार ७८४ क्यूसेक पर्यत वाढविला. तर पानशेत मधून सोडलेले पाणी थेट खडकवासल्यात जमा होते. पानशेतचा विसर्ग वाढत गेल्याने खडकवासल्यातून देखील पाण्याची पातळी वाढल्याने तीन हजार ४२४ क्युसेकने विसर्ग सुरू झाला. दुपारी दोन वाजता नऊ हजार ४१६ क्यूसेक केला. दुपारी चार वाजता १८ हजार ४९१ क्यूसेक केला. सायंकाळी सहा वाजता २६ हजार ८०९ क्यूसेक केला.
पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणात मध्ये ९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वरसगाव धरण देखील उद्या १०० टक्के भरेल. त्यानंतर त्यातून पाणी सोडावे लागेल. अशी परीस्थिती येऊ शकते. त्यामुळे नदीकाठ नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.
११ ऑगस्ट २०२२ संध्याकाळी पाच वाजताची स्थिती
धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी / मागील ११ तासातील पाऊस (मिलिमीटर मध्ये)
खडकवासला- १.९७/१.९७/१००/२
पानशेत- १०.६५/१०.६५/१००/४८
वरसगाव- १२.८२/१२.०४/९३.९३/४८
टेमघर- ३.७१/२.७९/७७.९९/६०
चार धरणातील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी
आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २७.५६ टीएमसी९४.५३टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.