Sick
Sick sakal
पुणे

पुणेकरांना सर्दी, खोकल्याचा ‘ताप’; कोरोना रुग्णसंख्याही वाढली

प्रशांत पाटील

पुणेकरांनो, स्वतःची प्रकृती सांभाळा. कारण शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

पुणे - पुणेकरांनो, स्वतःची प्रकृती सांभाळा. कारण शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनानिदान होत नाही, हे दिलासादायक आहे. मात्र, आता परत मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा आणि ताप आल्यास तातडीने उपचार घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, शहरात गेल्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे सर्व निर्बंध हटविण्यात आले असून व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सौम्य वाढ होत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना पुण्यात नेमकी काय स्थिती आहे, हे ‘सकाळ’ने जाणून घेतले.

पुण्यात आढळून आलेली स्थिती

  • बाह्यरुग्ण विभागात दोन आठवड्यांपासून रुग्ण वाढले.

  • ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ

  • वातावरणातील बदलांमुळे रुग्ण वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत

  • रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही

  • बहुतांश रुग्णांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह.

वैद्यकीय सल्ला...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढणार नाही, याची खबरदारी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचे टाळा. ताप आल्यास तो अंगावर काढू नका. तातडीने जवळच्या डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

आकडे काय सांगतात?

  • रुग्णालयात दाखल रुग्ण - ४.११%

  • आतापर्यंत कोरोनाबाधित - ६,६३,५८७

  • मृत्यू झालेले एकूण रुग्ण - ९,३५२

कोरोनाची सद्यःस्थिती -

  • पुण्यात दररोज एक हजारांहून जास्त रुग्णांची कोरोना चाचणी

  • त्यापैकी फक्त दोन आकड्यांमध्ये रुग्णांना कोरोना निदान

  • गेल्या १ जूनपासून संसर्गात सौम्य वाढ

  • गेल्या सात दिवसांत कोरोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ नाही. कोरोना विषाणूंमध्ये बदल झाल्याने काही रुग्ण आढळत आहेत. पण त्यातून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सामान्य औषधांच्या वापरातून आणि पुरेशी विश्रांती घेऊन रुग्ण खडखडीत बरा होत आहे. मात्र, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब अशा रुग्णांनी प्रकर्षाने काळजी घ्यावी.

- डॉ. मुकुंद पेनुरकर, संजीवन रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT