पुणे

मेट्रोला तीन हजार कोटींचा "बूस्टर' 

मंगेश कोळपकर

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षांत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम आता सुपरफास्ट होणार आहे. परिणामी, वर्षअखेरीस दोन्ही शहरांमध्ये प्रत्यक्ष धावणारी मेट्रो नागरिकांना पाहता येईल. 

युरोपियन युनियनच्या बॅंक ऑफ फ्रान्सने मेट्रोसाठी 1984 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्याबातच्या करारावर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. केंद्र सरकारनेही देशातील 9 मेट्रो प्रकल्पांसाठी 17 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूरचा समावेश आहे. तिन्ही प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पांना किमान प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्य सरकारनेही बुधवारी सादर केलेल्या चार महिन्यांच्या अर्थसंकल्पात 230 कोटी रुपयांचा निधी पुणे मेट्रोसाठी दिला आहे. 

परिणामी, येत्या आर्थिक वर्षांत मेट्रोच्या कामाला आणखी वेग येणार आहे. वनाज-रामवाडी मार्गावर शिवाजीनगर धान्य गोदामापर्यंत 308 पैकी 165 खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर आता मेट्रो मार्गासाठी स्पॅन टाकण्याचे काम सुरू होईल. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 456 पैकी 208 खांब उभारण्यात आले आहेत. त्यावरही स्पॅन टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी सुमारे सहा किलोमीटरच्या मार्गावर डिसेंबर अखेरीस मेट्रोची चाचणी होणार आहे. त्यासाठी पॉवर डक्‍ट निर्माण करणे, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन आदी कामांच्या निविदा आता प्रसिद्ध होऊन चार महिन्यांत त्यांच्या कामाला प्रारंभ होणार आहे. वनाज-रामवाडी मार्गासाठी नदीपात्रात 59 खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावरील स्पॅन जोडण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर प्रारंभ होईल. वनाज ते गरवारे महाविद्यालदरम्यान स्पॅन जोडण्याचे काम महिनाभरात आणखी वेगाने सुरू होईल. 

येत्या आर्थिक वर्षासाठी मेट्रोला उपलब्ध झालेला निधी 
- बॅंक ऑफ फ्रान्स - 1984 कोटी 
- केंद्र सरकारचा निधी - 1000 कोटी 
- राज्य सरकारचा निधी - 230 कोटी 

बॅंक ऑफ फ्रान्सचा निधी तांत्रिक कामांसाठी उपलब्ध झाला आहे. येत्या एप्रिलपासून त्याचा विनियोग करण्यास सुरवात होईल. केंद्र आणि राज्य सरकारचाही निधी लगेचच उपलब्ध होणार असून, त्यातून भुयारी मेट्रो, मेट्रोची 31 स्थानके आणि दोन्ही मेट्रो मार्गांची "सिव्हिल वर्क'ची कामे मार्गी लागतील. पुरेशी आर्थिक तरतूद झाल्यामुळे मेट्रोचे काम वेग घेईल. 
-हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापन, जनसंपर्क विभाग 

खडकवासला-स्वारगेट मेट्रो रखडणार 
स्वारगेट-कात्रज, रामवाडी-वाघोली, नाशिक फाटा-चाकण या विस्तारित मार्गांचा प्रकल्प अहवाल येत्या दोन महिन्यांत दोन्ही महापालिकांना सादर होईल. तर खडकवासला ते स्वारगेट दरम्यानचा मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल महापालिकेने अद्याप तयार करण्यास सांगितलेले नाही, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT