Cold Pune sakal
पुणे

Pune Cold : पुणे शहर पुन्हा गारठले; पाषाणमध्ये सर्वांत कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान

पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद बुधवारी (ता. २०) झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद बुधवारी (ता. २०) झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी किमान तापमानाचा पारा ३.२ अंश सेल्सिअसने घसरला. अवघ्या तीन दिवसांमध्ये पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमान पाषाण येथे १०.४ अंश सेल्सिअस होते.

पुण्यात गेल्या गुरुवारी (ता. १४) १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर हवेतील गारठा वाढला. रात्री थंडीत वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. १५) आणि शनिवारी (ता. १६) किमान तापमान अनुक्रमे १२.३ आणि १२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर शहरातील गारठा कमी होऊन किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढला. गेल्या तीन दिवसांमध्ये रविवारी (ता. १७) १३.२, सोमवारी (ता. १८) १४.५ आणि मंगळवारी (ता. १९) १५.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. मात्र अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान पुन्हा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. ही यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्री म्हणून नोंद झाली.

पुढील दोन दिवसांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून हवेतील गारठा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. पुढील ४८ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे शहरात गारठा वाढत आहे.

शहरात डिसेंबरमधील सर्वाधिक थंड रात्र

(किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

  • २७ डिसेंबर १९६८ ...................... ३.३

  • ११ डिसेंबर १९७० .......................३.६

  • १३ डिसेंबर १९७० ....................... ३.९

  • १० डिसेंबर १९७० ........................ ४

  • ९ डिसेंबर १९७० ...........................४.४

  • १ डिसेंबर १९७० .......................... ४.६

  • ११ डिसेंबर १९८१ ........................ ४.७

  • २६ डिसेंबर १९७५ ........................ ४.८

  • १२ डिसेंबर १९८१ ......................... ५

  • ८ डिसेंबर १९७० ............................ ५.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT