New Rule sakal
पुणे

पुणे : शहरात पुन्हा निर्बंध लागू

राज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महपालिकेनेही (Pune Corporation) शहरात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. शहरात रात्री ९ ते सकाळी ६ या दरम्यान, जमावबंदी लागू असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी आज (ता. २५) काढले. खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही हे नियम लागू असणार आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत.

राज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर हे आदेश काढले आहेत. समारंभ, नाट्यगृह, खुल्या आणि बंदिस्त मैदानातील कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या निश्‍चीत केली आहे.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात १०० नागरिकाची मर्यादा असेल तर खुल्या मैदानात जास्तीत जास्त २५० जण किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा कमी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीसाठी हेच बंधन असणार आहेत. हॉटेल, जीम, स्पाच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. आपत्ती निवारण कायद्यानुसार या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT