Street Vaccume Cleaner
Street Vaccume Cleaner Sakal
पुणे

धूळ न उडवता स्वच्छता करण्यावर महापालिकेचा भर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बदलत्या काळानुसार स्वच्छतेचे काम वेगाने होण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचे महापालिकेचे (Municipal) नियोजन असून, त्यासाठी शहरातील ४८० किलोमीटरच्या १८ मुख्य रस्त्यांची मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्सच्या माध्यमातून दररोज स्वच्छता (Cleaning) करण्यात येत आहे. याखेरीज ‘आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह’अंतर्गत ६०० किलोमीटरच्या रस्त्यांचीही ‘स्ट्रीट व्हॅक्युम क्लीनरच्या (Street Vaccume Cleaner) माध्यमातून सफाई केली जाते. (Pune City Dust Road Machine Cleaning by Municipal)

मेकॅनाईज्ड पद्धतीने दररोज स्वच्छता केल्या जाणाऱ्या रस्त्यांमध्ये नगर रस्ता, विमानतळ रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, बाणेर रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता इत्यादींचा समावेश आहे.

महापालिकेकडील प्रत्येक मेकॅनाईज्ड रोड स्वीपरतर्फे एका तासात पाच किलोमीटरच्या रस्त्याची झाडलोट केली जाते. एकूण आठ तास चालणारे हे काम रोज रात्री केले जाते. सफाई करण्यापूर्वी रस्त्यांवर पाणी शिंपडले जाते, त्यामुळे झाडलोट करताना धूळ उडत नाही. एकूण १२ वाहनांमार्फत रोज सुमारे ४८० किलोमीटर रस्त्यांची सफाई केली जाते. आगामी काळात छोट्या रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी कमी क्षमतेची वाहनेही खरेदी करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

पुण्यासह देशातील प्रमुख महानगरांमधील हवेतील सूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम २.५ आणि पीएम १०) प्रमाण २०२४ पर्यंत २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा’अंतर्गत शहरातील रस्त्यांची दररोज धूळ न उडवता सफाई केली जावी, असे सुचविण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळा’ने पुणे महापालिकेस दोन मेकॅनाईज्ड रोड स्वीपर्स दिलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स प्रतिसाद देत ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सुरू केलेल्या ‘आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून शहरातील जवळपास ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई केली जाते. दिवसाच्या वेळी होणाऱ्या या सफाईसाठी ४५०हून अधिक कामगार व २२५हून अधिक स्ट्रीट व्हॅक्युम क्लीनर्सचा वापर केला जातो. यातील ५० टक्के व्हॅक्युम क्लीनर्स बॅटरीवर चालत असल्याने प्रदूषणही होत नाही. ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या (सीएसआर) माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पुणे ही देशातील पहिलीच महापालिका आहे.

सफाई कामगार आणि नव्या युगाची यंत्रे असा सुवर्णमध्य राखत पुण्याच्या स्वच्छतेचे शिवधनुष्य उचलले जात आहे. पुण्यातील सुमारे १,१०० किलोमीटर रस्ते वाहतुकीला अडथळे न येता दररोज साफ केले जातात. शहराच्या स्वच्छतेला वरच्या पायरीवर नेण्याचे काम यातून होत आहे.

- गणेश बिडकर, सभागृह नेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT