पुणे

β पुण्याला नावं ठेवायची फॅशनच आहे!

अमित घरत

आजकाल पुण्याला नावं ठेवायची फॅशनच आली आहे. "ई-सकाळ‘वर एखादी बातमी पुण्याची असेल, तर ‘पुण्याचे लोक किती बेशिस्त, पुणेकर किती अरेरावी करतात‘ वगैरे प्रतिक्रिया येत असतात. पण विचार करण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे पुणेकर तुमचे-आमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईकच आहेत; जे नोकरी, शाळा, कॉलेज यासाठी पुण्यात आले आहेत. 

पुण्यातील वाहतूक व्यवस्था हा एक कळीचा मुद्दा आहे. कारण, मुंबईसारखे रेल्वेचे जाळे इथे नाही. त्यामुळे सगळा ताण रस्त्यांवरच येतो. लोकांच्या बेशिस्तपणामुळे हा ताण आणखी वाढतो आणि त्यामुळे लोकांवरच त्याचा परिणाम जाणवतो. ‘बीआरटी‘चा पर्यायही या वाहतूक कोंडीला थांबवू शकलेला नाही. हडपसर-कात्रज बीआरटीमधून खासगी वाहनेनी सर्रास धावत असतात. वाहतूक पोलिसही त्यावर काहीच कारवाई करत नाहीत.

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेला बीआरटी प्रकल्प आणि रस्त्याचे झालेले रुंदीकरण यामुळे इथे काही प्रमाणात वाहतूक सुखाची झाली आहे. पण केवळ प्रश्‍न निर्माण करण्यापेक्षा त्यावर उत्तरे शोधण्याची गरज आहे. 

वाहतूक कोंडी होण्याची काही कारणे : 
1) रस्त्यावर असलेली पथारीवाल्यांची दुकाने 
2) अनधिकृत रिक्षास्टॅंड 
3) रेल्वेक्रॉसिंगसाठी हवा असलेला उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाचा अभाव 
4) बीआरटीमध्ये घुसणारे खासगी वाहनचालक 

या सर्वांवर काही तोडगा निघायला हवा. 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा, रस्त्याचे गरजेचे असलेले रुंदीकरण, हातगाड्या, पथारीवाले यांच्यापासून मुक्त झालेले रस्ते, स्वतंत्र रिक्षास्टॅंड आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे लोकसहभाग या गोष्टी होणे आवश्‍यक आहे. ‘आता उठवू सारे रान‘सारखी चळवळ उभी राहिली पाहिजे आणि हे पुण्यात नक्कीच होऊ शकते. मग ‘पुणे तिथे काहीच नसे उणे‘ अशी म्हण तयात व्हायला वेळ लागणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT