pune rain sakal
पुणे

पुणे शहरात पुढील तीन तास पावसाचा जोर राहणार कायम

पुणे शहर आणि परिसरात रविवारी (ता. १०) रात्रीपासून पाऊस सातत्याने सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर आणि परिसरात रविवारी (ता. १०) रात्रीपासून पाऊस सातत्याने सुरू आहे.

पुणे - शहर आणि परिसरात रविवारी (ता. १०) रात्रीपासून पाऊस सातत्याने सुरू आहे. तर पुढील दोन दिवस शहरात ३५ ते ४५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाद्वारे वर्तविण्यात आली आहे. सध्या मान्सून सक्रिय असल्याने पुढील 72 तास जिल्ह्यात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी अशाच कायम राहणार आहेत. राज्यावर पावसाचे ढग दाटून आले आहेत, त्यामुळे सध्या जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. घाट परिसरात जोरदार सरींमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी देखील सुरू आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना देखील अडचणी निर्माण होत आहेत. मागील सहा तासात शहरात पाच मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील तीन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस असाच कायम राहणार आहे.

मागील सहा तासांमध्ये पडलेल्या पावसाची नोंद (मिलिमीटर मध्ये)

शिवाजीनगर : ५

लोहगाव : ५.२

चिंचवड : १२

लवळे ७.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT