SNDT Hill Sakal
पुणे

SNDT Hill : पुणे शहरातील अस्तित्व हरवलेली ‘एसएनडीटी‘ टेकडी!

पुणे शहरातील सर्वांत उंच असलेल्या वेताळ टेकडीचा भाग म्हणजे ‘एसएनडीटी’ टेकडी. वृक्षराजींनी ही टेकडी बहरली होती. पण, नंतर टेकडीवर वस्ती वाढत गेली आणि हळूहळू टेकडीचे अस्तित्व संपले.

जितेंद्र मैड

पुणे शहरातील सर्वांत उंच असलेल्या वेताळ टेकडीचा भाग म्हणजे ‘एसएनडीटी’ टेकडी. वृक्षराजींनी ही टेकडी बहरली होती. पण, नंतर टेकडीवर वस्ती वाढत गेली आणि हळूहळू टेकडीचे अस्तित्व संपले.

कोथरूड - शहरातील सर्वांत उंच असलेल्या वेताळ टेकडीचा भाग म्हणजे ‘एसएनडीटी’ टेकडी. वृक्षराजींनी ही टेकडी बहरली होती. पण, नंतर टेकडीवर वस्ती वाढत गेली आणि हळूहळू टेकडीचे अस्तित्व संपले. आता राहिले आहेत फक्त टेकडीच्या खुणा!

‘एसएनडीटी’ महाविद्यालयामागे वेताळ टेकडीचा भाग येतो. महाविद्यालयालगत असलेल्या सोसायट्यांमध्ये टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या वस्त्यांमधून कामगार पायवाटेने खाली येत असतात. टेकडीवर वस्ती वाढत गेली आणि आता टेकडीचे अस्तित्वच राहिले नाही अशी परिस्थिती आहे.

येथील डोंगराच्या वरील बाजूस महानगरपालिकेची पाण्याची टाकी आहे. विविध मंडळांनी टेकडी लगतच्या भागावर शेड उभारून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. बालभारती ते पौडरस्ता हा प्रस्तावित रस्ता या भागातून जाणार आहे. त्यामध्ये सुमारे दिडशे घरे जाणार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. बालभारती ते एसएनडीटी पाण्याची टाकी या भागात मोठी जलवाहिनी टाकण्यात आली. या कामासाठी शेकडो झाडे पाडण्यात आली.

वन कायद्याचा धाक आणि भांबुर्डा वन विहाराच्या संरक्षक भिंतीमुळे येथील वनसंपदा टिकण्यास मोठी मदत झाली. निसर्गप्रेमी टेकडीवर जाताना आठवणीने पाणी घेऊन जातात. झाडांना पाणी देण्याबरोबरच पक्षुपक्ष्यांनाही पाण्याची व्यवस्था करतात. वनखात्याने ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत.

- दत्ता गायकवाड, केळेवाडी

महात्मा सोसायटी लगत असलेल्या टेकडीवर जाणारी पायवाट कुंपण टाकून बंद करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याविरोधात टेकडी वाचवा अभियान आम्ही सुरू केले आहे.

- राजाभाऊ गोरडे, कुमार परिसर

सेनापती बापट रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी बालभारती पौड रस्ता हा पर्याय प्रशासन पुढे करत आहे. माझ्या माहिती प्रमाणे २००२ मध्ये या रस्त्याचे काम सुरू झाले. त्याचवेळी टेकडी फोडून झाली आहे. कोणाला बघायचं असेल तर सुरेख सोसायटी येथे येऊन बघावं. हा रस्ता १०० फुटी म्हणजे आताच्या विधी महाविद्यालय रस्त्यापेक्षा दुप्पट आहे. हा सरळ रस्ता आहे त्याला कोठेही फाटे नाही. त्यामुळे हा रस्ता झालाच पाहिजे पण पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे केल्यास बराचसा खर्च वाचेल.

- अमित अगरवाल, अमर सोसायटी

बिडिपीचा प्रयोग फसला आहे हे लक्षात घेऊन जुन्या शहरातील १९९७ मध्ये समाविष्ट झालेली गावे व गेल्या वर्षांत जोडलेली गावे यातील टेकड्यांवर फोडाफोड न करता कसे सुंदर निवासी प्रकल्प होतील याचा विचार होऊन तिथल्या जमीनधारकांना विश्वासात घेऊन योजना आखाव्यात.

- मानवेंद्र वर्तक, चांदणी चौक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT