Colour Work in pune city sakal
पुणे

Pune : G20 ची महत्त्वपूर्ण बैठक आज शहरात

शहरांचा विकास, शाश्वत जीवनशैलीवर होणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरांतील शाश्वत विकासाला चालणा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय जी - २० परिषदेतंर्गत पायाभूत सुविधांबाबत कार्यगटाची पहिली महत्त्वपूर्ण बैठक शहरात सोमवारी (ता. १६) होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या या बैठकीत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. तसेच जागतिक बॅंक, एशियन बॅंकेच्याही प्रतिनिधींचा त्यात समावेश असेल. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ होईल. पायाभूत सुविधांसाठीचा जाहिरनामा या बैठकीत तयार होईल.

यंदाच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे परिषदेच्या बैठका देशात होत आहे. त्यातील पायाभूत सुविधांची बैठक शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये होणार आहे. बैठकीत शहरांचा विकास ते शाश्वत जीवनशैली असे एकूण सात सत्र होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमोन अरोकियाराज यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली. मंगळवारी (ता. १७) बैठकीचा समारोप होईल.

देशातील शहरांचा विकास कसा करता येईल, शहरीकरणामुळे झालेल्या समस्यांवर उपाययोजना शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी जमा करणे, शाश्वत जीवनशैलीकडे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. उदघाटनानंतर जगभरातील पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्या समोरची आव्हाने यावर चर्चा होईल. दुपारी १ ते ३ दरम्यान 'शहरीकरण' या विषयावर परिसंवाद होईल.

त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय लोककला, लोकसंगीत व लावणी असे कार्यक्रम करून मराठी संस्कृतीची ओळख करून दिली जाणार असल्याचे अरोकियाराज यांनी सांगितले. यावेळी पीआयबीच्या संचालिका मोनीदिया मुखर्जी उपस्थित होत्या.

पर्यावरण ऱ्हास वर चर्चा....

शहरीकरणासह जागतिक पर्यावरणाचा ऱ्हास, कोवीड सारखी संकटे आली तर काय करावे यांसह तसेच शहरांचा आर्थिक विकास, शहर व ग्रामीण भागातील दरी, नागरिकांचे दरडोई उत्पन्न यावर मंगळवारी चर्चा होणार आहे. जी-२० च्या सदस्य देशांतून आलेले ६६ प्रतिनिधी त्यात सहभागी होतील.

पाहुण्यांना पुणे व महाबळेश्वरचे दर्शन:

बैठकीचा समारोप झाल्यावर मंगळवारी पुणे शहराचे दर्शन घडविले जाईल. यात पुण्यातील ऐतिहासिक स्मारके, स्थळांचा समावेश आहे. शनिवारवाडा, आगाखान पॅलेस यांना भेट दिली जाईल. तसेच महाबळेश्वर येथे जाण्याचे देखील नियोजन केले असल्याचे सोलोमोन अरोकियाराज यांनी सांगितले.

परदेशी गुंतवणूक वाढावी :

जी २० च्या माध्यमातून भारतात परदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी सहभागी प्रतिनिधी मंडळा समोर केंद्र सरकारतर्फे सादरीकरण होणार आहे. यात विविध योजनांची माहिती दिली जाईल. तसेच देशातील यशस्वी प्रकल्पाची देखील माहिती सांगण्यात येईल. यावेळी पायाभूत सुविधा, गुंतवणूक, रोजगार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT