Khadakwasala Dam Water sakal
पुणे

Water Reduction : जलपूजन झाल्यानंतरच पुण्यातील पाणी कपात मागे

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तर खडकवासला धरणात ५० टक्के पाणीसाठा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तर खडकवासला धरणात ५० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, खडकवासला धरणात जलपूजन झाल्याशिवाय म्हणजेच १०० टक्के भरून धरणाची दारे उघडल्याशिवाय पुणे शहरातील पाणी कपात मागे घेतली जाणार नाही. त्यामुळे आणखी काही काळ पाणी कपात मागे घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

एल निनो प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा वापर जपून करावा यासाठी राज्य सरकारने पुणे महापालिकेला सूचना दिल्या होत्या. तसेच धरणातील पाणी ३१ आॅगस्टपर्यंत वापरता यावे यादृष्टीने नियोजन करण्यासही सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने पाणी गळीत थांबविण्यासह पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. १८ मे पासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामधून किमान ०.२५ टीएमसी पाणी बचत होऊ शकते.

दर गुरवारी पाणी बंद ठेवल्याने शुक्रवारी, शनिवारी सुमारे २० टक्के भागाला अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीही येत आहेत. जलवाहिनीतील हवेचा दाब काढून टाकण्यासाठी १५० पेक्षा जास्त एअर वॉल्ह्व बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी आहे. जुलै महिन्यात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरीही अद्याप अशा पावसाची प्रतिक्षा आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये शनिवारी सायंकाळ पर्यंत ७.२६ टीएमसी म्हणजे २४.८९ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. तर खडकवासला धरणात ०.९९ टीएमसी म्हणजे ४९.९७ टक्के पाणी जमा झाले आहे.

खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर दर गुरुवारची पाणी कपात मागे घेतली जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जोरदार पाऊस होऊन धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाल्याशिवाय नागरिकांना दिलासा मिळणार नाही.

दरम्यान, याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘पाणी कपात मागे घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT