पुणे

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 20) शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी (वारजे) व नवीन होळकर या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. दरम्यान, शुक्रवारी (ता. 21) उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे...
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वेरस्ता ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

चतु:शृंगी, वारजे, एसएनडीटी जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर.

लष्कर जलकेंद्र ः लष्कर भाग, पुणे रेल्वेस्थानक, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूररस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.

नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता परिसर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT