Attack by sharp Weapon sakal
पुणे

Pune : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून एकावर कोयत्याने वार

तीन वर्षांपूर्वी कबड्डी खेळताना झालेल्या भांडणाचा राग

निलेश बोरुडे

सिंहगड : तीन वर्षांपूर्वी शाळेत कबड्डी खेळताना झालेला वाद व त्यानंतर झालेल्या हाणामारीचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एक एकोणीस वर्षीय तरुणावर कोयत्यांनी वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द येथे घडली आहे. बाबू विठ्ठल वणवे (वय 19 रा. गोऱ्हे खुर्द,ता. हवेली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी तरुण खानापूर येथील विद्यालयात असताना त्याच्यापासून लहान असणाऱ्या मुलांसोबत कबड्डी खेळण्यावरुन भांडणे झाली होती. त्यावेळी जखमी तरुण व त्याच्या मोठ्या भावाने काही मुलांना मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून बाबू वणवे व त्या मुलांमध्ये सतत शाब्दिक बाचाबाची होत होती.

बाबू वणवे हा गोऱ्हे खुर्द येथील त्याच्या टपरीत बसलेला असताना सध्या दहावीत शिकत असलेले ते तीन अल्पवयीन मुलं तेथे आली व ,"त्यावेळी तु आम्हाला मारले होते आता आम्ही तुला दाखवतो", असे म्हणून कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये बाबू वणवे याच्या डोक्यात व हातांवर खोल जखमा झाल्या आहेत. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार अधिक तपास करत आहेत.

एकाच दिवशी दोघांवर हल्ला..... हे तीनही अल्पवयीन मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांनी त्याच दिवशी खामगाव मावळ येथील एका तरुणावर कोयत्याने वार केले असून त्यालाही तब्बल सव्वीस टाके पडले आहेत. भीतीपोटी त्या तरुणाने या मुलांच्या विरोधात तक्रार दिली नसल्याची माहिती एका स्थानिकाने दिली आहे.

ज्यावर हल्ला झाला त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी........ज्याच्यावर हल्ला झाला त्या बाबू वणवे या तरुणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे. हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी काही महिन्यांपूर्वी त्याच्या टपरीतून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करुन गुन्हा दाखल केला होता.

अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये वाढ.......... खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले अवैध धंद्यांचे जाळे, वाढलेली व्यसनाधीनता आणि कायद्याचे संरक्षण यांमुळे अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चोऱ्या, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पंधरा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या लक्षणीय आहे. हवेली पोलीसांनी बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

SCROLL FOR NEXT