lach sakal
पुणे

Pune : वेल्हे येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीकास पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक

क्रारदार पांगारे यांनी याबाबत पुणे एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने २९ मे रोजी वेल्ह्यात येऊन पडताळणी केली असता पंढरीनाथ तमनर यांनी पन्नास हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

मनोज कुंभार-वेल्हे

Pune - सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन तसेच पाठपुरावा करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागणाऱ्या वेल्हे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (ता.१६) रोजी केली आहे.काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर असे लाच मागणाऱ्या लिपीकाचे नाव असून याबाबत विलास जगन्नाथ पांगारे (रा.वेल्हे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार वेल्हे गावातील रहिवासी विलास पांगारे यांना सावकारी लायसन्स काढायचे होते. या कामासाठी ते २० मे रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वेल्हे येथील कार्यालयात गेले होते.

त्यावेळी लिपीक पंढरीनाथ तमनर यांनी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी वरीष्ठ कार्यालयासाठी ३० हजार व स्वतः साठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार पांगारे यांनी याबाबत पुणे एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने २९ मे रोजी वेल्ह्यात येऊन पडताळणी केली असता पंढरीनाथ तमनर यांनी पन्नास हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

३० हजार रुपये वरिष्ठ कार्यालयासाठी तर स्वतःसाठी वीस हजार रुपये लाचेची रक्कम अन्य व्यक्तींच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले लाच मागितल्या प्रकरणे पुणे एसीबीने वेल्हे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून लिपिकास अटक केली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या पथकाने केली.अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहे.

सहाय्यक निबंधक कार्यालयात तील संबंधित लिपिका बाबत अनेक महिन्यापासून अनेक तक्रारी येत होत्या परंतु लिपकास एका राजकीय पक्षाचे पाठबळ असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास समोर कोण येत नव्हते या झालेल्या कारवाईवर नागरिकांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT