Pune closed sakal
पुणे

Pune News : पुणे बंदची १३ डिसेंबरला हाक; विरोधी पक्ष, संघटनांकडून निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल भाजपचे नेते वारंवार वादग्रस्त विधान करत असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल भाजपचे नेते वारंवार वादग्रस्त विधान करत असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल भाजपचे नेते वारंवार वादग्रस्त विधान करत असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्ष, समविचारी संघटनांची एसएसपीएम महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनता दल, आंबेडकर चळवळीतील संघटनांचा पाठिंबा आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी हे वादग्रस्त वक्तव्य करत शिवाजी महाराज व इतर महापुरूषांचा वारंवार अवमान करत आहेत. प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा व रावसाहेब दानवे यांनीही वक्तव्य केले आहेत.

हे प्रकार वारंवार होत असल्याने शिवप्रेमी शांत बसणार नाहीत. म्हणून या सगळ्यांची हकालपट्टी करावी. यांच्यावर कठोर शासन करावे अशी भूमिका बैठकीत उपस्थितांनी मांडली. त्यामुळे शिवप्रेमी नागिकांच्यावतीने च्या १३ डिसेंबर रोजी पुणे बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली.

या बैठकीस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, अविनाश मोहिते, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Results: एक बंडखोर नगरसेवक ठरवणार सत्ता कुणाची ? 'या' महापालिकेत भाजप जिंकूनही हारली

Thane Municipal Election: ठाणे जिल्ह्यात भाजपची घोडदौड, ६ पैकी ३ पालिकांवर झेंडा, दोन ठिकाणी शिंदे सेना

नव्या मालिका सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच स्टार प्रवाहने केली नव्या मालिकेची घोषणा, प्रोमोची होतेय चर्चा

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

Elephant Viral Vieo : नदीत वाहून चालले होते हत्तीचे पिल्लू, आईने 'असा' वाचवला जीव, भावूक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT