pune cng pump close for one day tomorrow new update All India Petrol Dealers Association news  sakal
पुणे

Pune CNG Pump : पुण्यातील CNG पंपाबाबत नवा खुलासा! फक्त 'हे' पंप राहणार बंद

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पेट्रोल डीलर असोसिएशनने हा बंद पुकारला असून त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने उद्या, 1 ऑक्टोबर रोजी पंपांवर टोरेंट सीएनजीची विक्री बंद असणार आहेत दरम्यान ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या बाबत खुलासा करत डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याचा निषेध म्हणून उद्या टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व आऊटलेट्स फक्त एक दिवस बंद राहतील अशी माहिती दिली आहे.

पुण्यातील 60 हून अधिक सीएनजी (CNG) पंप उद्या (शनिवारी) बंद राहणार आहेत. पेट्रोल डीलर असोसिएशनने 1 ऑक्टोबर रोजी नो सेल (NO SALE० बद्दल 7 दिवसांपूर्वी Torrent आणि OMC ला कळवले होते परंतु त्यावर त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे उद्या पुण्यातील काही CNG पंप एका दिवसासाठी बंद राहणार आहे.

डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याचा निषेध म्हणून उद्या टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व आऊटलेट्स फक्त एक दिवस बंद राहतील. तथापि, पुणे शहराच्या हद्दीतील सीएनजी स्टेशन्स ज्यांना MNGL पुरवठा आहे, ते दिवसभर उघडे राहतील. फक्त महामार्गावरील सीएनजी पंप बंद राहतील. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पुणे शहरातील ग्राहकांनी घाबरून जाण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी एका निवेदनात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT