Co-operative society elections sakal
पुणे

Pune : सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : राज्यातील ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत होत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून मंगळवारी आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. तर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीनेही ७ हजार १४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये ‘अ’ वर्गातील ३८, ‘ब’ १ हजार १७०, ‘क’ ३ हजार १५१ आणि ‘ड’ वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु आहेत. त्यामुळे गावागावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे सहकार विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्यावर असतील त्या टप्प्यापासून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, वर्ग ‘क’, ‘ड’ आणि वर्ग ‘इ’ तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळण्यात आल्या आहेत. पुढील आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील.

- डॉ. जगदीश पाटील, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण.

पतसंस्था फेडरेशनची निवडणूक स्थगित

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूक सुरू असून, बुधवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. परंतु निवडणूक स्थगित झाल्यामुळे पुढील आदेशानंतरच निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT