इतर बोर्डाच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आता सीबीएसईमध्ये प्रवेश esakal
पुणे

Pune : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र बुधवारपासून मिळणार

सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

Pune - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या ‘जुलै-ऑगस्ट २०२३’मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकिट) बुधवारपासून (ता.५) उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारी (ता.५) सकाळी अकरा वाजल्यापासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्र घेता येणार आहेत. काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरूस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायचे आहे. तसेच प्रवेशपत्रातील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यात दुरूस्ती असल्यास शाळा/महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.

विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा-महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेश पत्र देण्यात यावे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT