Pune Police campaign  sakal
पुणे

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांकडून 'कोम्बिंग ऑपरेशन'

तीन हजार सराइत गुन्हेगारांची झडती

सकाळ वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री गुन्हेगारांच्या तपासासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये त्यामध्ये पोलिसांनी तब्बल शहरातील तब्बल 2 हजार 924 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आले. त्यामध्ये 614 जणा त्यांच्या वास्तव्याच्या मुळ पत्त्यावर आढळून आले. बेकायदा स्त्र बाळगणाऱ्या 11 जणांना अटक करण्यात आली. तसचे पोलिसांनी या कारवाईमध्ये धारदार शस्त्रे, गावठी दारू, अंमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून सोमवारी शहरात हि मोहिम राबविण्यात आली होती. बेकायदा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली, त्यांच्याकडून 15 कोयते व दोन तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी या कारवाईमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील लॉज, हॉटेल्सची तपासणी केली. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परीसरात कारवाई करुन एकास अटक केली, तसेच चार किलो गांजा जप्त केला. तर गावठी दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 30 लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली. याबरोबरच पोलिसांना कारवाईमध्ये आढळलेल्या 41 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सागर पाटील, नम्रता पाटील, रोहिदास पवार, राहुल श्रीरामे यांच्या संपुर्ण शहरात हि मोहिम राबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT