Pune  Sakal
पुणे

Pune : मी पुन्हा पुन्हा येईन खासदार प्रकाश जावडेकर

वेल्हे तालुक्यातील विंझर गाव संसद आदर्श ग्राम साठी प्रकाश जावडेकर.

सकाळ वृत्तसेवा

वेल्हे : मी पुन्हा येईल, मी पुन्हा पुन्हा येईल' हे उद्गार होते माजी केंद्रीय मंत्री व हे खासदार प्रकाश जावडेकर यांचे परंतु त्यांचे हे वक्तव्य कोणत्याही राजकीय हेतूतून नसून वेल्हे तालुक्यातील विंझर गाव हे सासंद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा पुन्हा येईल असे उद्गार जावडेकर यांनी आयोजित आढावा बैठकीत काढले.

वेल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तालुक्यातील एखादे गाव दत्तक घेतले आहे. विंझर गावास याचा मान मिळाला असून, तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अण्णा शिंदे यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी विंझर गाव दत्तक घेतले असून आज शनिवार (ता. १५) रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जावडेकर बोलताना पुढे म्हणाले, 'संपूर्ण गाव आदर्श होण्यासाठी गावकऱ्यांबरोबर स्वतः खासदार यामध्ये लक्ष घालणार असून प्रत्येक महिन्यातून एकदा पूर्ण दिवसभर गावात येऊन केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार असून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाईल. ग्रामीण भागातील या गावांमध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठ्यावर काम करणार असून गाव एका नव्या पातळीवर नेणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.'

याप्रसंगी अण्णा शिंदे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, वेल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, महावितरण विभागाचे नवनाथ घाटूळे, पोस्ट विभागाचे सहाय्यक अधीक्षक गणेश वडुरकर, विलास जेधे, वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, विंझरचे सरपंच सुनील भोसले, विलास किर्वे, संभाजी भोसले, राहुल सागर, विनायक लिम्हण, सतीश लिम्हण, आधी सह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

गावातील बैठकीनंतर येथील अमृतेश्वर महाविद्यालयांमध्ये विविध बचत गटांची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी अमृतेश्वर कला महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रदीप फडके, प्राचार्य डॉ.संजीव लाटे , भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील जागडे, रवी दसवडकर, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान विंझर गावच्या वतीने खासदार प्रकाश जावडेकर यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत स्वागत कमान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत फुलांचा वर्षाव करण्यात खासदारांवर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT