नाना पटोले sakal
पुणे

पुणे हे कांग्रेसचे होते, कांग्रेसचेच राहणार : नाना पटोले

पुण्याचा विकास हा कांग्रेसने केला असून पुणे हे कांग्रेसचे होते आणि कांग्रेसचेच राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : पुण्याचा विकास हा कांग्रेसने केला असून पुणे हे कांग्रेसचे होते आणि कांग्रेसचेच राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार कांग्रेस स्वबळावर लढावी, यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी मान्यता दिली असून कार्यकर्त्यांनी कामाला लागून भाजपला पुणे महानगरपालिकेतून हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली वानवडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 11प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शाम पांडे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, सचिन साठे, अविनाश बागवे, मिलिंद आहिरे , मुक्तार शेख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी नगरसेविका कविता शिवरकर, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, इम्रान शेख, गणेश फुलारे, नितीन आरु, अमित घुले, इम्रान शेख, स्वप्नील डांगमाळी, दिलीप तुपे, संजय डोंगरे, संजय हरपळे, प्रा.शोएब इनामदार, प्रशांत सुरसे, विजय जाधव, शंभुशेठ जांभुळकर, दिनेश गिरमे आदींनी मेळाव्याचे आयोजन केले होते.

बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री

काँग्रेसने पुण्याचा सर्वांगीण विकास केला, पुण्यात अनेक उड्डाणपूल आम्ही बांधले, महापालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती, आगामी काळात निवडणुका स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.

सूत्रसंचालन गणेश फुलारे यांनी केले, आभार विजय जाधव यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT