pune construction department notice in three year vikram kumar  Sakal
पुणे

Pune News : बांधकाम विभागात नोटिशींचा हिशोब लावण्याची गडबड

शहरात गेल्या तीन वर्षात किती अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या, कितीवर कारवाई केली?,

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात गेल्या तीन वर्षात किती अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या, कितीवर कारवाई केली?, कारवाई न होण्याचे कारणे याचा अहवाल आयुक्त विक्रम कुमार यांना सादर करायचा असल्याने सध्या बांधकाम विभागात याच कामाची मोठी गडबड सुरु आहे.

कनिष्ठ अभियंते इतर कामे बाजूला ठेवून नोटिसांची माहिती संकलित करून अहवाल तयार करण्याच्या कामास प्रधान्य देत आहेत. आंबेगाव बुद्रूक येथे बांधकाम विभागाने एकाच वेळी ११ अनधिकृत इमारतींवर कारवाई केली.

त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली असताना दुसरीकडे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न उभे करण्यात आले आहेत. आंबेगाव बुद्रूक येथील इमारतींना २०२१ मध्येच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, पण तेव्हा कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान गेल्या दोन वर्षात अनेक नागरिकांनी तेथे फ्लॅट खरेदी केल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये एकाच दिवशी ५०० सदनिकांवर कारवाई केली. पण ही कारवाई उशिरा केल्याने यामध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेतली, त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची समिती गठित केली असून, त्यांना गेल्या तीन वर्षातील नोटिशींचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भातील पुढील बैठक १२ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान बिनवडे यांनी यासंदर्भात गुरुवारी (ता. ४) आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. बांधकाम विभागातील सर्व झोनमध्ये कनिष्ठ अभियंता, उप अभियंता हे त्यांनी गेल्या तीन वर्षात कोणत्या कोणत्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत याची माहिती शोधत आहेत.

त्यासाठी त्यांना जुन्या फाइलसुद्धा काढून बसावे लागत आहे. तर काही जण संगणकावरून नोटिसा शोधत आहेत. तसेच अनधिकृत बांधकामावर झालेली कारवाई, कारवाई न झाल्याने त्याचे कारण काय याचीही माहिती संकलित केली जात आहे. सध्या याच कामाला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे एका कनिष्ठ अभियंत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT