पुणे

मुळशीत चांदेरे- कलाटे लढाईत तिसऱ्या इच्छुकामुळे रंगत

CD

बंडू दातीर : सकाळ वृत्तसेवा
पौड, ता. १० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘अ’ गटातील पंचवार्षिक निवडणुकीच्या आखाड्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. विकास सोसायटीमधील ४६ मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे मतदाराला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष सुनील चांदेरे बाजी मारणार की तुषार कलाटे, बाळासाहेब उभे यांची रणनीती यशस्वी होणार, याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.
मुळशीच्या सहकारात जिल्हा बॅंकेची निवडणूक सन २०२२ पासून खऱ्या अर्थाने गाजू लागली. त्यापूर्वी सहकारमहर्षी मामासाहेब मोहोळ, माजी खासदार अशोक मोहोळ, आत्माराम कलाटे यांनी बॅंकेत अध्यक्षपदाची, तर जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कलाटे सर्वाधिक बावीस वर्षे संचालक होते. सन २०२२मध्ये त्यांच्याविरोधात सुनील चांदेरे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या. ती निवडणूक अटीतटीची, आर्थिक उलाढालीची आणि प्रतिष्ठेची झाली होती. त्यात ४५ पैकी २६ मते मिळवून चांदेरे विजयी झाले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उपाध्यक्षपद बहाल केले होते. चांदेरे यांनीही बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले.
यावेळच्या निवडणुकीत तालुक्याचे राजकीय चित्र सन२०२२ पेक्षा वेगळे आहे. मागील वेळी एकत्र असलेली राष्ट्रवादी आता एकमेकांच्या विरोधात उभी राहीली आहे. चांदेरे यांनी पुन्हा तयारी केली असून, कलाटे यांचे पुत्र तुषार आणि टेमघरचे माजी सरपंच बाळासाहेब उर्फ रामचंद्र श्रीपती उभे यांनीही दंड थोपटले आहेत. ४६ विकास सोसायट्यांतून आपल्या विचाराचा मतदार प्रतिनिधी निवडून यावा, यासाठी उमेदवारांनी आताच मोठी ताकद लावली आहे. तसेच, काही मतदारांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले असून, त्यांची सरबराईही करण्याचे काम उमेदवारांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. विजयाचे गणित गाठण्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव चालू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रणनीती आखली गेली आहे. नात्यागोत्याच्या, वरिष्ठ राजकीय दिग्गजांच्या, तसेच भूतकाळात निष्ठेने केलेल्या कामाच्या, मैत्रीच्या आणि मध्यस्थांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा चालू आहे. पडद्याआडच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

आमदारांची प्रतिष्ठा पणाला
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच निवडणूक लागल्याने शंकर मांडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मागील वेळी एकत्रित राष्ट्रवादीत चांदेरे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे यांनाही आपल्या पक्षाच्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे.

मुळशी तालुक्यातील वर्गनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे- अ वर्ग- ४६, ब वर्ग- १, क वर्ग- १८, ड वर्ग- १४. एकूण मतदार- ७९.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

SCROLL FOR NEXT