MPSC Aspirants Died due to Corona 
पुणे

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा कोरोनाने मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२) पहाटे घडली. वर्षभरानंतर स्पर्धा परीक्षा होत असताना ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. वैभव हा मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता, साॅफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर त्याने  शासकीय नोकरी मिळविण्यासाठी २०१५ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. काही परीक्षांमध्ये तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखती देखील दिल्या होत्या. वैभवला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने तो १६ मार्च रोजी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. त्यातच त्याची प्राणज्योत मावळली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी गेले वर्षभर तणावात असताना वैभव शितोळेचे कोरोनाने निधन झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

कन्हैया टकले म्हणाले, " मी चार वर्ष त्याचा रूममेट होतो, वैभवला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.  शुक्रवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे.  वैभव एक हुशार आणि आम्हाला प्रेरणा देणारा मित्र होता."


अनेक विद्यार्थी पाॅजिटिव्ह 
पुण्यात कोरोनाच्या संसर्गाचा फटका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून, अनेक विद्यार्थी पाॅजिटिव्ह आहेत. महेश घरबुडे म्हणाला, मला कोरोना झाल्याने जम्बो रुग्णालयात उपचार घेत आहेत. माझ्या ओळखीतील अनेक मुलांना लागन झाली अाहे. अनेकजण गावाकडे निघून गेले आहेत. त्यामुळे ११ एप्रिलची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT