पुणे

पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूनी एकाच दिवशी ओलांडला शंभराचा आकडा

विनायक होगाडे

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) एकाच दिवसांत कोरोनामुळे तब्बल ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात आज पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना मृत्यूनी शंभराचा आकडा ओलांडला आहे. आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४९ मृत्यू आहेत. जिल्ह्यात आज ९ हजार ९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील ५ हजार ३९५ जण आहेत. काल (बुधवारी) जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ९४ होता. त्यात आज २० मृत्यूची भर पडली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधिक ९९ मृत्यू झाले होते. त्यामुळे आजच्या मृत्यूने याआधीचा उच्चांक मोडला आहे. दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १७, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन मृत्यू आहेत.

जिल्ह्यात आज ८ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ३२१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ११०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ४१८, नगरपालिका हद्दीतील १६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजच्या एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार८६ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७८२, नगरपालिका हद्दीतील ५२६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १६७ रुग्ण आहेत. सद्यःस्थितीत २३ हजार २२२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७५ हजार ६३१ गृहविलगीकरणात आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार ६२७, पिंपरी चिंचवडमधील ६ हजार ५४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार १४२, नगरपालिका हद्दीतील २ हजार २८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६२६ रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

SCROLL FOR NEXT