Breakfast 
पुणे

Pune Corona : पुण्यात नियमांचे पालन करत करावी लागणार खासगी वाहतुक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने सोमवारी काढलेल्या नव्या आदेशानुसार काही अटी व शर्तींवर खासगी वाहतुक सुविधा सुरू ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. रिक्षा, टॅक्‍सी, कॅब, खासगी वाहने व खासगी बससाठी यांना महापालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करुन वाहतुक करता येणार आहे. 

अशी आहेत वाहतुकीसंदर्भात महापालिकेने घातलेली बंधने 

* रिक्षामध्ये चालक अधिक दोन व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा असेल 
* टॅक्‍सी, कॅब, चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालक अधिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) निश्‍चित केलेल्या आसन क्षमतेच्या 50 टक्के आसन क्षमतेलाच मान्यता असणार आहे. 
* नागरीकांना प्रवास करताना मास्क बंधनकारक असून मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड पडेल 
* सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांमध्ये प्रवाशालंना मास्कचा वापर बंधनकारक असेल. मास्क नसल्यास चालक व प्रवासी यांना प्रत्येकी 500 रुपये दंड द्यावा लागेल 
* प्रत्येक फेरीनंतर वाहन सॅनिटाईज करणे बंधनकारक आहे 
* सर्व सार्वजनिक वाहतुक करणारे वाहनचालक व इतर कर्मचारी यांना लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत 15 दिवसांची वैधता असणारा कोविड 19 निगेटीव्ह (आरटीपीसीआर) प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे. चालकाने त्याच्याभोवती प्लॅस्टिक शिट लावले असल्यास त्यास त्यांना या प्रमाणपत्र दाखल्याची आवश्‍यकता नसेल. संबंधीत नियम 10 एप्रिलपासून लागू आहे 
* लसीकरण प्रमाणपत्र/ कोविड 19 निगेटीव्ह प्रमाणपत्र जवळ न बाळगल्यास एक हजार रुपये इतका दंड द्यावा लागेल 
* रेल्वेत उभा राहून तसेच विनामास्क प्रवास करता येणार नाही, तसे आढळल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. 

सर्व प्रकारच्या खासगी वाहने, खासगी बसेस सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहती. तसेच शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 यावेळेत पुर्णतः बंद राहतील. 
* खासगी बस वाहनाच्या आसन क्षमतेनुसार सुरू राहतील, प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत 
* सर्व खासगी वाहतुक करणारे चालक/मालक व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण नसल्यास चालक/मालक यांनी 15 दिवसांची वैधता असणारा कोविड 19 निगेटीव्ह (आरटीपीसीआर) प्रमाणपत्र जवळ बाळगावे. हा नियम 10 एप्रिलपासून लागू करण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT