पुणे

कोरोनाचा कहर; पुण्यात गतवर्षी एप्रिलमध्ये 1 मृत्यू, यंदा 14 दिवसांतच 342 !

शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात केवळ चार जण दगावले होते.

विनायक होगाडे

पिंपरी : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात केवळ चार जण दगावले होते. यंदा मात्र एप्रिलमधील अवघ्या १४ दिवसांतच ३४२ दगावले आहेत. दररोजचे सरासरी प्रमाण २० आहे. पिंपळे गुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू आहेत. बेशिस्तिमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी खाट मिळणे व त्यातल्या त्यात आयसीयू कक्षात उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याच कारणामुळे कमी वयाच्या रुग्णाचे देखील दगावत आहेत. वेळेत उपचार आणि आयसीयू बेड मिळाला तर हे प्रमाण कमी होऊ शकते. पण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडाही उच्चांक गाठताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी पहिला बळी १२ एप्रिलला गेला. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एकूण बळींचा विचार करता १२ एप्रिल २०२० ते एक मार्च २०२१ या ११ महिन्यांत १ हजार ६३७ बळी गेल्याची नोंद आहे. मात्र नंतरच्या अवघ्या ४० दिवसांतच १४९ जणांचे मृत्यू झाले. गेल्यावर्षी दिवसाला सरासरी ४१ संशयित रुग्ण आढळत होते. आता हाआकडा हा अडीच ते तीन हजार झाला आहे. त्यातही हा एप्रिल महिना फारच वाईट ठरला. १४ तारखेला ९ हजार ७५३ रुग्ण दाखल आहेत. १३ आणि १४ तारखेला एकून ८६ मृत्यूची नोंद झाली.

एप्रिल २०२०

तारीख- संशयित रूग्ण - मृत्यू संख्या

१. ४१-०

२. ४०-०

३. ४९-०

४. २६-६

५. ८८-०

६. १९-०

७. ३२- ०

८. २६-०

९. ४०-०

१०. ७४-०

११. ५६-०

१२. ६५-१

१३. ५९-०

१४. ७१-०

एप्रिल २०२१

तारीख- संशयित रूग्ण - मृत्यू संख्या

१. २११३-१७

२.२४६३-१९

३. २८३२-१७

४. ३३८२-१८

५. २१५२-१६

६. २९०४-१७

७. २७८४-१६

८. २३५१-२१

९. २००९-२३

१०. २२३९-२८

११. २४०९-३०

१२. २१८८-३४

१३. १८३८-४१

१४. १५१७ -४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT