पुणे

Pune Corona Update : शहरात नवे ३ हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरात आज नव्याने ३ हजार २६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ३६ हजार ३४९ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ३०३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ८९ हजार ४९९ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १९ हजार ७९० नमुने घेण्यात आले आहेत.

पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २२ लाख १० हजार २३८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३९ हजार ७३२ रुग्णांपैकी १,४१५ रुग्ण गंभीर तर ६,६३४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ११८ इतकी झाली आहे.

पुणे शहरात काल नव्याने २ हजार ८७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्याहून आज नवीन रुग्णांची अधिक भर पडली आहे. देशातील परिस्थिती पाहता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर भारतात थांबताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासांत एका दिवसातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. यासोबतच भारतात आतापर्यंत एकूण 2,26,188 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 3,82,315 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 34,87,229 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर देशातील पॉझिटीव्हीटी रेट 24.80% वर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT