पुणे

पुणेकरांना दिलासा! सोमवारी आढळले पाचशेपेक्षाही कमी रुग्ण

विनायक होगाडे

पुणे : पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ८५ दिवसानंतर (सुमारे तीन महिने) सोमवारी (ता.२४) पाचशेच्या आता आली आहे. शहरातील आजची नवीन रुग्णसंख्या १ मार्चच्या रुग्णसंख्येच्या आसपास पोचली आहे. आज ४९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी १ मार्चला ४०६ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर २ मार्चपासून रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडत पुढे तो साडेसात हजारांपर्यंत पोचला होता. यामुळे पुणे शहरातील कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे शहराची परिस्थिती

शहरात आज नव्याने ४९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६६ हजार ११९ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ४१० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४८ हजार ३५२ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ५८२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ४४ हजार ०२८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ९ हजार ७२४ रुग्णांपैकी १,०५९ रुग्ण गंभीर तर २,५८७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ०४३ इतकी झाली आहे.

एकूण पुणे जिल्ह्यातील परिस्थिती

शहरापाठोपाठ जिल्ह्यातील दररोजच्या नवीन रुग्णांची संख्याही ७९ दिवसानंतर आज पहिल्यांदाच दोन हजारांच्या आसपास आली आहे. जिल्ह्यात आज २ हजार २० नवे रुग्ण सापडले आहेत. याआधी ७ मार्चला २ हजार ४४ रुग्ण सापडले होते. तेव्हापासून सातत्याने हा आकडा वाढतच गेला होता. दरम्यान, तीन आठवड्यांच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दिवसातील नवीन रुग्णांची संख्या ही एक हजाराच्या आत आली आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात आज ९३६ नवे रुग्ण सापडले आहेत. मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने हा आकडा किमान दोन हजारांहून अधिक असे. जिल्ह्यात आज ६ हजार ६४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसांतील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील १ हजार ४१० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६२६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३ हजार ६७४, नगरपालिका हद्दीतील ६१० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पिंपरी चिंचवडमध्ये ४२३, नगरपालिका हद्दीत १४९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात केवळ १८ नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ३६ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील २४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४ आणि नगरपालिका हद्दीतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

शासनाकडून महापालिकेला आज (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे उद्या (मंगळवारी) महापालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद असणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. शहरात महापालिकेतर्फे ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण सुरू आहे. शासनाकडून शनिवारी १३ हजार डोस उपलब्ध झाले होते, त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण सुरू होते. सध्या महापालिकेकडे मोजके डोस उपलब्ध आहेत, त्यातून लसीकरण करणे शक्य नसल्याने मंगळवारचे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाचे पुढील नियोजन जाहीर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT