Pune Corona Update 
पुणे

Pune Corona Update: शहरात 5 हजारहून अधिक नवे रुग्ण; 44 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात आज एकाच दिवसात २७ हजार ९८६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १६ लाख ७१ हजार ४३७ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४९ हजार ९५५ रुग्णांपैकी १,००३ रुग्ण गंभीर तर ४,६६२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ६५४ इतकी झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने ५ हजार ६४७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख १८ हजार ०२९ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ५८७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ६२ हजार ४२० झाली आहे. 

  • उपचार सुरु : ४९,९५५
  • नवे रुग्ण : ५,६४७ (३,१८,०२९)
  • डिस्चार्ज : ४,५८७ (२,६२,४२०)
  • चाचण्या : २७,९८६ (१६,७१,४३७)
  • मृत्यू : ४४ (५,६५४)

केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.

शनिवारी आणि रविवारी दूध विक्री सुरु

आज सायंकाळी ०६:०० ते सोमवारी सकाळी ०७:०० या संचारबंदीच्या काळात मेडिकल आणि दूध विक्री दुकाने वगळून सर्व दुकाने बंद राहतील. दूध विक्रीची दुकाने सकाळी ०६:०० ते सकाळी ११:०० या वेळेत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवठा करणारे कंपनी (ई-कॉमर्स, स्विगी, झोमॅटो इ.) यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करण्यास परवानगी राहील. शुक्रवारी सायं ६ ते सोमवारी स. ७ या संचारबंदी काळात नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेण्यास प्रतिबंध राहील. मात्र घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. पुणे महानगरपालिका क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस/नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी राहील.

कोरोना लसीकरण सुविधा सुरूच!

कोरोना लसीकरण केंद्रावर जाण्यास आठवड्यातील कोणत्याही दिवशी प्रतिबंध नसेल. ही सुविधा आठवड्यातील सर्व दिवस सुरूच राहतील. याची पुणेकरांनी नोंद घ्यावी ! पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या बांधकामाच्या ठिकाणीच कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे, असे बांधकाम शनिवार-रविवारही सुरु ठेवण्यात येईल. याची बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित घटकांनी नोंद घ्यावी. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधेसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते सायंकाळी ०६:०० या वेळेत सुरू राहतील.

चष्म्याच्या दुकानांना परवानगी !

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील चष्म्याची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT