Corona Updates sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०९ ने वाढली

पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ८२७ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांत (Corona Patient) गुरुवारी (ता.१६) सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १०९ ने वाढली आहे. याआधी मंगळवारच्या (ता.१४) तुलनेत बुधवारी सक्रिय रुग्णांमध्ये ७१ ने वाढ झाली होती. सलग दोन दिवस झालेल्या रुग्णवाढीमुळे पुणे जिल्ह्यातील (Pune District) एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ८२७ झाली आहे. शिवाय रुग्णालयांत (Hospital) उपचार घेणाऱ्या आणि गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

याउलट जिल्ह्यातील दिवसांत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही मागील दोन दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत तुलनेने कमी झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात२२५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून याउलट ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १२२ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५२, नगरपालिका ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन रुग्ण आहेत.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ३८, पिंपरी चिंचवडमधील ४२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २०, नगरपालिका हद्दीतील ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा रुग्ण आहेत. सध्या शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५९९ रुग्णांवर उपचार सुरु असून, उर्वरित १ हजार २२८ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT