Cloth Bags
Cloth Bags  sakal
पुणे

Cloth Bags : मशिनमध्ये नाणे टाकून घ्या कापडी पिशव्या !

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खरेदीसाठी बाजारात गेलात, पिशवी जवळ नसेल, तरी चिंता करू नका, कारण कापडी पिशव्यांचे व्हेडिंग मशिन शहराच्या विविध भागांमध्ये बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या मशिनमध्ये ५, १० किंवा २० रुपयांचे नाणे (क्वॉइन) टाकून तुम्हाला कापडी पिशव्या उपलब्ध होणार आहे.

झेन्सार आरपीजी फाउंडेशनतर्फे सीएसआर अंतर्गत आठ कापडी पिशव्या मशिन व एक प्लास्टिक डिस्पोजल मशिन महापालिकेस भेट देण्यात आले. या फाउंडेशनमध्ये सिएट, झेन्सार, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड, आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, आरपीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड, स्पेन्सर्स आणि कंपनी लिमिटेड अशा विविध संस्थांचा समावेश आहे.

महापालिकेतर्फे प्लास्टिक निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना त्यात नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिक प्लास्टिकचा सर्रास वापर करताना दिसतात. हे टाळण्यासाठी त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. बस व रेल्वे स्थानक, मॉल, विमानतळ, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी मशिन बसविणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, झेन्सारच्या शुभा कुमार, भानुश्री शर्मा, पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, डॉ. केतकी घाटगे, योगेश हेंद्रे, स्वाती देशमुख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

SCROLL FOR NEXT