Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची उद्घाटनासाठी लगबग

महापालिकेच्या पक्षनेत्यांनी आज तब्बल ८६ उद्घाटनांसह इतर कार्यक्रमांना मान्यता दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता येत्याकाळात शहराच्या सर्वच भागात नगरसेवकांकडून धुमधडाक्यात प्रभागातील लहानमोठ्या कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला जाणार आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांनी आज तब्बल ८६ उद्घाटनांसह इतर कार्यक्रमांना मान्यता दिली.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता लागणे अशक्य असल्याने महापालिकेवर प्रशासक येईल व सर्व नगरसेवक आपोआप माजी नगरसेवक होणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रभागातील उरलेली कामे, वर्गीकरण लवकर करून घेण्यासाठी नगरसेवकांची गडबड सुरू आहे. जी कामे झाली आहेत त्याचे उद्घाटन ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत करून प्रभागात पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नगरसेवकांचा आहे.

प्रभागात बांधण्यात आलेले क्रीडांगण, अग्निशामक केंद्र, रस्ता, लाइट हाऊस प्रकल्प, पाण्याची टाकी, विकसित केलेले उद्यान, महापुरुषांचे पुतळ्याचे अनावरण, जीमन्यॅशियम हॉल, चौकांमध्ये किंवा दुभाजकावर किंवा पादचारी मार्गावर उभारण्यात आलेले शिल्प, बालोद्यान, प्रसूतिगृह, ओटा मार्केट, चौक सुशोभीकरण यासह इतर अनेक उद्घाटनाचे व महापालिकेत महापुरुषांचे तैलचित्र व लाल महालमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली हे तैलचित्र लावावेत असे प्रस्ताव मंजुरीसाठी पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे ठेवण्यात आलेले होते.

त्यास आज मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हे प्रस्ताव लगेच मुख्यसभेपुढे ठेवून त्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये सत्ताधारी भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा समावेश आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी मंजुरीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT