rpi-bjp Sakal
पुणे

PMC Election: पुण्यात रिपाइला हवे भाजपचे चिन्ह अन २० जागा

रिपाइला सोबत घेऊन लढणार असे भाजपने स्पष्ट केल्यानंतर आजा रिपाइने शहरात २० जागांवर दावा केला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक आम्ही रिपाइला सोबत घेऊन लढणार असे भाजपने स्पष्ट केल्यानंतर आजा रिपाइने शहरात २० जागांवर दावा केला आहे. गेल्या पाच वर्षात पक्षाचा विस्तार झाला असून, योग्य उमेदवार असल्याने या जागा हव्या आहेत. तसेच भाजपच्या कमळाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढणार असल्याचे रिपाइचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. प्रभाग रचना जाहीर होताच, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी आघाडीची भूमिका सोडून थेट स्वबळाची भाषा केली आहे. त्यास शिवसेना व काँग्रेसकडून जशास तसे उत्तर दिले आहे. तर सभागृहनेते गणेश बीडकर यांनी रिपाइला सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करत राष्ट्रवादीने स्वबळाची भाषा करत शिवसेनेवर अन्याय केला असा आरोप केला होता.

रिपाइचे शहराध्यक्ष चव्हाण, उपमहापौर सुनीता वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज आम्ही भाजपसोबत असल्याचे स्पष्ट केले. ‘‘गेल्यावेळी आम्ही १२ जागा लढविल्या होत्या, त्यातील तीन अर्ज बाद झाले. ९ पैकी पाच ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले. आमची कामगिरी चांगली होती, असे धेंडे यांनी सांगितले.

जगतापांची बीडकरांना २५ लाखाची आॅफर

राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत, त्यांच्यात हिंमत असेल तर २४ तासात ८० उमेदवारांची यादी जाहीर करावी असे आव्हान बीडकर यांनी दिले होते. त्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिआव्हान दिले आहे. बीडकर यांनी स्वतःची उमेदवारी, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, जगदीश मुळीक, औंध, बाणेर बालेवाडीसह ५० ठिकाणचे उमेदवार २४ तासात जाहीर करावेत. मी बीडकरांना २५ लाख रुपये देतो, असे सांगितले.

आमची काळजी करू नका - शिवसेना

भाजपने आमच्यासोबत कशी वागली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करत आहे हे भाजपने सांगू नये. राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आमची काळजी करू नका अशी टीका नगरसेवक बाळा ओसवाल यांनी बीडकरांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT