Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Corporation Election: भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार फोडण्यासाठी खलबतं

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी लढत असल्याने दोन्ही पक्षांकडून इतर पक्षातील नगरसेवकांची तसेच तुल्यबळ उमेदवारांना फोडण्यासाठी खलबत सुरू झाली आहेत. नगरेसवकांचा प्रवेश लगेच होऊ शकणार नसला तरी त्यांचे निकटवर्तीय किंवा पतीपत्नी यांचा प्रवेश करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. तर आरक्षणे जाहीर झाल्यावर पक्षांतरास आणखी वेग येणार आहे. (Pune Municipal Corporation Election Updates)

निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यात मोठ्याप्रमाणात प्रभाग बदलले गेले आहेत. बहुतांश नगरसेवकांना ५० टक्के देखील भाग त्यांच्या सोईचा नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिकेत बहुमतासाठी १७३ पैकी ८७ नगरसेवकांचे बळ सोबत असणे असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक, तुल्यबळ उमदेवारांचा दोन्ही पक्षांकडून शोध सुरू झाला आहे.

वडगाव शेरीमध्ये सध्या १४ नगरसेवक हे भाजप व रिपाइ युतीचे आहेत. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केले असून, भाजपमध्ये गेलेले नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यापैकी काहींनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. वडगाव शेरीतून आता २७ नगरसेवक निवडून जाणार आहेत. येथे राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपचे सध्या सहा नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तर आरक्षणांची सोडत निघाल्यानंतर व स्थानिक समीकरणे लक्षात घेता आणखी दोन ते तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकतात. हा मतदारसंघ भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा असल्याने तेथे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते काय करणार याकडे लक्ष लागले आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार व जवळपास २० नगरसेवकांची फौज येथे आहे. काही नगसेवकांचे प्रभाग सुरक्षीत असले तरी अनेकांचे मतदानाचे गणित बिघडल्याने ते चिंतेत आहेत. पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांकडे राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे. परंतु, हे नगरसेवक पूर्वीपासून भाजपचेच असल्याने राष्ट्रवादीची ही चाल यशस्वी होते का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पर्वती व खडकवासला मतदारसंघाचा भाग असलेल्या संपूर्ण सिंहगड रस्त्यावर व धायरी, वडगाव मध्ये राष्ट्रवादीचा सध्या एकही नगरसेवक नाही. या दोन्ही मतदारसंगातील काकडे गटाच्या नगरसेवकांनी इतर पक्षात चाचपणी सुरू केली आहे. तर या मतदारसंघतील राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नगरसेवक पक्षांतर्गत कुरबुलीला वैतागून भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे.

शिवाजीनगरमध्ये १२ भाजपचे नगरसेवक आहेत, त्यापैकी दोघे राष्ट्रवादीत येऊ शकतात अशी स्थिती आहे. पण राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी झाल्यास राष्ट्रवादीतील नाराज गट भाजपला मदत करू शकतो. तसेच भाजपने गोखलेनगर व इतर भागातील काही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तुल्यबळ उमेदवारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या चार जणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असली तरी पक्ष सोडून दुसरीकडे जाणाऱ्यांची शक्यता कमी आहे. गेला तरी निवडून येण्याची नसल्याने सध्या तरी भाजपला या मतदारसंघात धोका नाही. कसबा विधानसभा मतदारसंघात नव्या रचनेनुसार दोन पूर्ण प्रभाग आहेत. तर उर्वरित चारचा काही भाग दुसऱ्या मतदारसंघात गेला आहे. भाजपला येथे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादीला येथे तुल्यबळ उमेदवार नसल्याने नाराजापैकी काहींना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT