pmpml sakal
पुणे

PMPML: पीएमपी प्रवासात चोरट्यांचा उच्छाद

शहरातील वेगवेगळ्या मार्गावर घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांकडील एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMP) बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील वेगवेगळ्या मार्गावर घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांकडील एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरला.(PMPML Pune)

डेक्कन जिमखाना, बाजीराव रस्ता परिसरात या घटना घडल्या असून एका महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरुवारी (ता. ३ ) कात्रज ते डेक्कन जिमखाना या मार्गावरील पीएमपी बसने प्रवास करत होती. बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या हातातील ८० हजार रुपयांची सोन्याची बांगडी लांबविली. चोरट्यांनी कटरचा वापर करून बांगडी लांबविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलिस उपनिरीक्षक किशोर शिंदे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेकडील ऐवज लांबविण्याची आणखी एक घटना घडली असून तिने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या शुक्रवारी (ता. ४) कात्रज ते अप्पा बळवंत चौक या मार्गावर प्रवास करत होती. चोरट्यांनी महिलेच्या बॅगमधून ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि त्यांच्या मुलीच्या पर्समधील रोख पाच हजार रुपये आणि पेंडल असा एकूण ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT