Pune PMC  sakal
पुणे

पुणे : भूमिगत केबलच्या शुल्काचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

शहराच्या विविध भागात भूमिगत केबल टाकण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात भूमिगत केबल टाकल्यानंतर त्याचे दरवर्षी भाडे घेण्यासाठी महापालिका (pune corporation) प्रशासनाने धोरण तयार केले आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी स्थायी समितीसमोर (standing committee) ठेवला आहे. केबलच्या एकूण क्षेत्रफळावर विभागनिहाय शुल्क घेणे शक्य नसल्याने सरासरी दर आकारावा, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

शहराच्या विविध भागात भूमिगत केबल टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत केबलच्या एकूण क्षेत्रफळावर शहराच्या विभागनिहाय वाजवी भाड्याच्या दराप्रमाणे आकारणी करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. मोबाईल टॉवरप्रमाणे भाड्याचा दरसुद्धा लावता येणार नाही. त्यामुळे दरनिश्चितीसाठी सरासरी दर आकारण्यात येणार आहे.

भूमिगत केबलचे एकूण क्षेत्रफळ निश्‍चीत करण्यासाठी खड्ड्यांची लांबी, रुंदी आणि खोली हे सूत्र अवलंबणे शक्य होणार नाही. त्यामुळे भूमिगत केबलची वास्तव लांबी आणि सरासरी रुंदी एक फूट ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार एक किलोमीटरच्या केबलसाठी चटई क्षेत्रफळ ३ हजार २८० चौरस फूट ग्राह्य धरले जाईल. वार्षिक भाड्यातून देखभाल दुरुस्तीचे १० टक्के खर्च वजा करून, उर्वरित रक्कम वसूल करणे शक्य होईल, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

हल्लेखोर को-पायलटचं नाव समोर, ओमानमध्ये घातलेली बंदी; कट्टरपंथी विचारसरणीचा असल्याचंही उघड

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Gold Silver Prices : पितृपक्षामुळे सोने-चांदीची 'झळाळी' पडली फिकी; ग्राहकांची खरेदीकडे पाठ, आता विजयादशमीची आशा, जाणून घ्या दर

SCROLL FOR NEXT