pune municipal corporation 
पुणे

Pune Corporation : वेळे आधीच होत आहेत उद्याने बंद

सुरक्षा रक्षकांच्या आडमुठ्यापणामुळे वेळ संपण्यापूर्वीच नागरिकांना बाहेर हुसकावले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनानंतर महापालिकेची उद्याने उघडली असली तरी उद्यान विभागातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या आडमुठ्यापणामुळे वेळ संपण्यापूर्वीच नागरिकांना बाहेर हुसकावले जात आहे. थंडी वाढत असल्याने नागरिक जास्त वेळ व्यायाम करण्यावर भर देत असताना महापालिकेकडून मात्र त्यांना सहकार्य केले जात नसल्याचे समोर आले आहे.

मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. अचानक सर्व व्यवहार ठप्प झाले, नागरिकांना त्याच फटका बसला. पण त्याच सोबत उद्याने बंद झाली, व्यायामासाठी बाहेर फिरण्यावरही बंधने आली. त्यामुळे नागरिकांना अनेक महिने घरातच व्यायाम करावा लागला होता. जवळपास दीड वर्ष शहरातील उद्याने बंद होती.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आल्यानंतर आॅगस्ट महिन्यात शहरातील उद्याने सुरू झाली. शासनाने ब्रेक द चेन नियमावलीअंतर्गत उद्याने सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामध्ये सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत नागरिकांना सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करून व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली. महापालिका हद्दीत सुमारे २०० उद्याने आहेत. तेथे नागरिकांसाठी ज्वागिंग ट्रॅक, ओपन जीम, प्राणायाम करण्यासाठी जागा अशा सुविधा उपलब्ध आहे.

स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक असलेले पुणेकर पहाटेपासूनच व्यायाम, चालणे, सायकलींग यासाठी बाहेर पडतात. यामध्ये उद्यानांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सकाळी उद्यानांसाठी ६ ते १० अशी वेळ असताना उद्यानांमधील सुरक्षा रक्षक नागरिकांना ९ वाजताच बाहेर जाण्यास सांगतात. काही नागरिक हे रात्री उशीरा काम करून घरी येतात. अशांना सकाळी लवकर उद्यानांमध्ये जाणे शक्य होत नाही. तसेच ६ ते ८ पर्यंत उद्यानांमध्ये गर्दी जास्त असल्याने नागरिक लवकर जाण्याचे टाळत आहेत. अशा नागरिकांना उद्याने सकाळी ९ वाजताच बंद केल्याचा फटका बसता आहे. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडेही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत.

‘‘राज्य शासनाच्या नियमांनुसार सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ७ अशी उद्याने खुली ठेवण्याची वेळ आहे. सकाळच्या वेळेत उद्याने १० पूर्वीच बंद केले जात असल्याची तक्रार काही ठिकाणांवरून आली आहे. तेथे लक्ष घालून उद्याने १० पर्यंत सुरू ठेवा असे आदेश दिलेले आहेत.’’

- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT