Pune Crime:  sakal
पुणे

Pune Crime: आव्हाळवाडीत १० ते १२ चोरट्यानी केला बंद घरात चोरीचा प्रयत्न, परिसरात भितीचे वातावरण

Avadvadi crime News | या परिसरात अजून रात्री ड्रोन फिरत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. चोरटे पळून जाताना सी सी टीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Vagholi Crime Update: आव्हाळवाडी येथील देवीदास आव्हाळे यांच्या बंद घरावर शनिवारी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र एका तरुणाने आरडा ओरड केल्यानंतर चोर पळून गेले. १० ते १२ जण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान याच मध्यरात्री त्या भागात ड्रोन फिरत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांनी भेट दिली आहे          

                    मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाळे कुटुंबीय देवदर्शनासाठी घर बंद करून गेले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सुमारे १० ते १२ जण आव्हाळे यांच्या घराजवळ आले. ते दुचाकीवर आले होते.

आव्हाळे यांच्या घराशेजारीच त्यांच्या चुलत भावाचे घर आहे. दुचाकीचा आवाज आल्याने त्यांच्या भावाच्या मुलाने खिडकीतून डोकावले. त्याला १० ते १२ जण दिसले. काही गेटच्या आत होते. तर बाकी गेट बाहेर होते. त्यांनी आव्हाळे यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा तोडला. आव्हाळे यांच्या चुलत भावाच्या मुलाने आवाज देवून एवढ्या रात्री इथे काय करता असे विचारले.

थांबा मी खाली येतो असेही तो म्हणाला. यानंतर चोरांनी त्याच्या घरच्या गॅलरीच्या काचेच्या दारावर दगड टाकला. त्यांने आरडा ओरड सुरू केल्यानंतर चोर पळून गेले.  या घटनेपूर्वी या भागात ड्रोन फिरत होता.

त्याचा चोरीशी संबंध असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या परिसरात अजून रात्री ड्रोन फिरत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. चोरटे पळून जाताना सी सी टीव्ही मध्ये कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटना स्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT