pune crime News  sakal
पुणे

Pune Crime: १२० जनावरे ताब्यात; तर ३ जणांना अटक

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

Pune Crime: स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेल्हे (ता. जुन्नर ) येथे छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची व्यवस्था न करता, अवैधरित्या निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेली ११६ वासरे व ४ गायी अशी एकूण १२० जनावरे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

याप्रकरणी अल्ताब हमीद बेपारी ( वय वर्ष 48 रा.मुक्ताबाई चौक,बेल्हे जिल्हा पूणे 2)हसिफ शरीफ बेपारी (वय 36 रा. पेठ आळी बेल्हे जिल्हा पुणे), कल्पेश रौफ कुरेशी वय 19 रा. पेठ आळी,बेल्हे ) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देणे आले आहे. जनावरांची रवानगी गो शाळेत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेतील

पोलीस पथकाने आज पहाटेच्या सुमारास बेल्हे येथे छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची व्यवस्था न करता, अवैधरित्या निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेली ११६ वासरे व ४ गायी अशी एकूण १२० जनावरे ताब्यात घेऊन त्यांना जीवनदान दिले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, साहेब फौजदार प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, जनार्धन शेळके, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT