Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : बारामतीत एकाच रात्रीत 14 सदनिका चोरट्यानी फोडल्या; जवळपास 20 तोळे सोनं चोरले...

एकाच रात्रीत टोळीने 14 सदनिका फोडल्यामुळे बारामती शहरात चिंतेचे वातावरण

मिलिंद संगई, बारामती

बारामती - शहरातील जिल्हा क्रीडा संकुलानजिक 14 सदनिका फोडून अज्ञात चोरट्यानी जवळपास साडे बावीस तोळे सोने व एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली आहे.

आज पहाटे तीन ते चारच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने जिल्हा क्रीडा संकुला नजिक पाच अपार्टमेंटमधील जवळपास 14 सदनिकांना लक्ष्य करून कुलूप व कडी कोयंडे तोडून या घरफोडया केल्या आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

एकाच रात्रीत टोळीने 14 सदनिका फोडल्यामुळे बारामती शहरात चिंतेचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही नागरिकाला चोरट्याने मारहाण केलेली नसून बंद सदनिकांना लक्ष्य केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.

एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात घर फोड्या होत असताना गस्तीवरचे पोलीस नेमके कोठे होते व एवढ्या घरफोड्या झाल्यानंतर देखील कोणाला त्याचा कसा सुगावा लागला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने तपास सुरू केला आहे.

दरम्यान पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून चोरट्यांच्या गाडीचे व चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. ज्या फ्लॅटमध्ये घरफोड्या झाल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा सदनिका बंद अवस्थेतील आहेत. एकाच सदनिकेमध्ये जवळपास 20 तोळे सोनं चोरीला गेल्याचेही त्यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT