विवाहाचे आमिष दाखवून सव्वालाखाची फसवणूक. Sakal
पुणे

Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची २२ लाखांची फसवणूक

याबाबत वाघोली येथील एका ३० वर्षीय तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वाघोली येथील एका ३० वर्षीय तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तरुणीसह जय भगवान रोकडे (दोघे रा. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जय रोकडे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील एका तरुणीची सोशल मीडियावर या तरुणासमवेत मैत्री झाली. त्यानंतर या तरुणीने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून घरगुती आर्थिक अडचण असल्याचे सांगितले.

पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन तरुणाकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने २२ लाख रुपये घेतले. आर्थिक अडचणीत आलेल्या तरुणाने पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु तिने तरुणाला उडवाउडवीचे उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT