Fraud news esakal
पुणे

Pune Fraud : गुंतवणुकीच्या आमिषाने ३०० कोटी रुपयांची फसवणूक

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे - चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सेल्वकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात सुरू केले होते. नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.

आरोपी नडार आणि खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजना मांडल्या होत्या. काही जणांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले होते. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते. तक्रारदार पवार यांचा विश्वास संपादित करून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले होते. तक्रारदार यांची ३६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी पवार यांच्यासह २०० जणांकडून वेगवेगळी कारणे सांगून ३०० कोटी रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

आरोपींच्या संस्थेतील प्रतिनिधी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकदारांना दिला जायचा तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करून दिल्यास काही हप्ते फेडले जायचे. ज्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले आहे. अशा कर्जदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधला जात होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT